Headlines

परतीच्या पावसाने हातातील पीक वाया जाण्याची भीती

 सिंदखेड राजा /बालाजी सोसे सिंदखेड राजा  तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद 69.6 मीमी पावसाची नोंद असून सुद्धा परिसरामध्ये दिनांक 20 ते 21/9/2020 रोजी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचं पूर्णपणे नुकसान झाले होतं .त्यानंतर पाऊस थांबल्याने शेती नांगरणी ,कल्टीवेटर ,रोटा अशा प्रकारची शेती ची मशागत करायची आहे. पण पुन्हा काल पळसखेड चक्का परिसरामध्ये परिसरातील काल दिनांक १०/१०/२०२० सकाळी ११ सुमारास पाऊस सुरू झाला. आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली थोडीफार सोयाबीन राहिलेली होती. ती काढायला आल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून टाकली आणि पावसाला सुरुवात झाली आता शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळणार नाही .हे सिद्ध झालं कारण कालपासून आज संध्याकाळ  पर्यंत सतत पाऊस असल्यामुळे सोयाबीनला कोम आल्यामुळे पूर्ण सोयाबीन मातीत गेलेली आहे .थोडीफार कपाशी वाचली होती बोंड होती. ती पण सुद्धा पावसाने पूर्णपणे नुकसान झालेली आहे. आता शेतकऱ्यांनी काय करावं काही शेतकऱ्याला कळत नाही .सोयाबीन गेली. मूक गेला .मका गेली .उडद गेला .सर्व पिक गेल्याने आता शेतीचा केलेल्या खर्चाचे दुकानदाराची उधारी कशी द्यायची असं संकट शेतकर्‍यांपुढे उभे राहिलेलं आहे .शेतकऱ्याचा सण दीवाळी हा सण सुद्धा आलेला आहे .दिवाळी सुद्धा शेतकऱ्याची अंधारात जाणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच चिंता पडलेली आहे .की आता कसं करायचं त्यावरच शेतकऱ्याला सरकार माय बापाने तातडीने मदत करून शेतकऱ्याला मदत करावी. अशी या परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *