Breaking NewsEducationPoliticsyuva sanvaad

पबजी…….

जीवघेणा नाद लागला पबजीचा 
आजच्या पिढीतील या तरुणांना , 
जीव एकवटून मारतात गोळ्या 
तहानभूक ही लागत नाही वेड्यांना… 
शत्रू मारण्याची योजना करायला 
सारे टोळी करून  बसतात, 
खऱ्या आयुष्यात मोडतील मनं
खेळताना मात्र जीवाला जीव देतात..
मोबाईलचे पैसे फेडता-फेडता 
आई -बापाचं जिवंतपणी मरण होतं , 
‘जय पबजी’ म्हणत लाडकं लेकरू 
एकलकोंड्या विश्वाचं होऊन जातं….
आयुष्याचं मोल या व्यसनाधीनांना 
आता कोण हो समजून  सांगणार, 
लाखमोलाच्या जीवाला पबजी 
आरपार पोखरून काढणार….. 
कवडीमोलाचा खोटा डाव रंगवून 
खऱ्या स्वप्नाना भंगवून टाकतात, 
अडकून पबजीच्या बेडीमध्ये 
उज्वल भविष्याला उखडून काढतात….. 
शत्रूला मारण्याची भूक लागलीय 
तर तरुणांनो भरती व्हा लष्करात
आत्महत्येने  विषय न होता मस्करीचा 
 गर्वाने लपेटून या देशाच्या तिरंग्यात .
  कु.अश्विनी शिवाजी चव्हाण.
      कुंभारगाव ( सांगली )

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!