पबजी गेमचे रजिस्ट्रेशन सुरू, प्री रजिस्ट्रेशन केल्यास मिळणार रिवॉर्ड

गेल्या वर्षी केंद्र सरकारने डेटा सुरक्षेच्या मुद्यावरून काही चिनी ॲप्लिकेशन्स बंद केले होते. यामध्ये पबजी मोबाईल गेम चा देखील समावेश होता.

तरुणाईकडून विशेष पसंती दिली जाणारा हा गेम आता पुन्हा येणार आहे. जून महिन्यात हा गेम लॉन्च होण्याची शक्यता आहे.

18 मे पासून गुगल प्ले स्टोअरवर बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असं नाव बदलून पुनरागमन झालेल्या गेमचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

या गेमचे फ्री रजिस्ट्रेशन केल्यास रिवॉर्ड मिळणार असून हे रिवॉर्ड केवळ भारतीयांसाठी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ज्या युजर्सचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या पालकांचा मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य असेल.

2 thoughts on “पबजी गेमचे रजिस्ट्रेशन सुरू, प्री रजिस्ट्रेशन केल्यास मिळणार रिवॉर्ड

Leave a Reply