Breaking NewsPolitics

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

लातूर/पुरूषोत्तम बेले  – पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसा चे औचित्त्या साधून आज निलंगा शहरातील प्रत्येक दिव्यांगाना सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथी म्हणून भाजपा युवती मोर्चा लातूर जिल्हा अध्यक्ष-ऋतुजा ताई (पंडित)पोतदार, उपस्थित  होत्या. त्यांनी दिव्यांग लोकांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, त्यांच्या  अडचणीचं समाधान करत.. लवकरात लवकर त्या अडचणी सोडवू व सर्व प्रश्न मार्गीलावू असा विश्वास उपस्तीथ दिव्यांग लाभार्थ्यांना दिला. उपस्थित शहरातील दिव्यांगांनी घरकुल असेल, स्व. व्यावसाय योजना असेल, मानधन, राशन न भेटण्याच्या तक्रारी मांडल्या. मा.संभाजी भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे असही त्या म्हणाल्या . तालुका अध्यक्ष: प्रणिता केदारे, आरती सोर्डे, श्रावणी राचट्टे, बाळू पोतदार, प्रल्हाद जी, तसेच महाराष्ट्र दिव्यांग कामगार कल्याण संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष-ज्ञानेश्वर राठोड, शहर अध्यक्ष- अलिमोद्दीन शेख, उपाध्यक्ष-दीपक पाटील, औसा तालुका सचिव- हरिभाऊ कुलकर्णी इत्यादी उपस्थित  होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!