Uncategorized

पंढरपूरमधील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात

पंढरपूरमधील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात… विलगीकरणासाठी पंढरपूरचे चार विभाग करा– न.पा. बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांची सुचना                                           

पंढरपूर /नामदेव लकडे – पंढरपूर शहराच्या विविध भागात सध्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतेय. सध्या विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात पोहचतेय. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण कक्षात अनेक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. विलगीकरण कराव्या लागणार्‍या नागरिकांची संख्याही वाढतेय, त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणासाठी पंढरपूर शहराचे वेगवेगळे चार विभाग करावेत व त्या त्या भागातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणासाठी स्थानिक भागातील मठ आणि धर्मशाळा ताब्यात घेण्यात येत असुन संबंधित ठिकाणीच स्थानिक नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करावे. अशा सुचना पंढरपूर नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत. त्यानुसार आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेसह नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरीतील विविध भागातील मठांची पाहणी केली.
स्थानिक नागरिकाचे जवळपास असलेल्या ठिकाणीच संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार्‍या नागरिकांना सोयीचे ठरेल. संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी पंढरीतील विविध मठांची व धर्मशाळांची पाहणी करुन मठाधिपतींना विलगीकरणासाठी मठ आणि धर्मशाळा ताब्यात द्याव्यात. अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार 4 मठांमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. आजपर्यंत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात पोहचली आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता आहे ती संस्थात्मक विलगीकरणासाठीची व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे पंढरपूर शहराचे वेगवेगळे 4 विभाग करुन त्या त्या भागातील मठ, धर्मशाळा ताब्यात घेवून स्थानिक नागरिकांना आपापल्या भागातच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरु आहेत. अशी माहिती बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!