Headlines

नेहरू युवा केंद्र, साताराच्या वतीने समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य

 

सातारा -नेहरू युवा केंद्र, सातारा (युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार), महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई,  यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कोरेगाव येथे, जिल्ह्याचे युवा अधिकारी गोपी त्तिरी व लेखाधिकारी भानुदास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य घेण्यात आला, यावेळी कोरेगांव पंचायत समिती सभापती श्री राजाभाऊ जगदाळे साहेब, स्वयंम फाउंडेशन चे प्रतिनिधी, मा.अमर लोखंडे सर कुमटे गावातील नागरिक उपस्थित होते.

 तसेच कोरेगांव तालुक्यातील बाजारपेठ साठी प्रसिद्ध असलेली वाठर किरोल येथे ग्रामपंचायत परिसर मधे बाजाराचे अवचीत्या साधून हा पथनाट्य घेण्यात आला, पथनाट्य पाहण्यासाठी बाजार पेठेत आसपासच्या गावातील अनेक नागरिक जमले होते, त्याचबरोरीने हा पथनाट्य , जळगांव, आर्वी, शिरढोण, आणि सातारा जिल्हा मध्ये, अनेक ठिकाणी घेण्यात येणार आहे,असे नेहरू युवा केंद्रचे प्रतिनिधी रमेश पुजारी यांनी सांगितली. आणि हा पथनाट्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रम बर्गे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *