नळदूर्ग परिसरामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी

प्रतिंनिधी/अक्षय वायकर – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील हंगरगा, बोरगाव (तु.), नंदगाव, सिंदगाव , कुन्सावळी, सलगरा(मड्डी),अचलेर ,आलूर आदी गावांसह परिसरामध्ये परतीच्या पावसाने आज दमदार हजेरी लावली आहे .तब्बल तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पाणलोट क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली असून परिसरातील सर्व छोटी-मोठी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.या भागांमध्ये मागील काही वर्षापासून खरीप हंगामामध्ये सोयाबिन हे पीक मोठ्या प्रमाणात  घेतले जात आहे. या पिकाची काढणी चालू आहे. 50 टक्के शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असून अजून पन्नास टक्के शेतकऱ्यांची पीक काढणे बाकी आहे.त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण असले तरी मानवासह वन्यजीव तसेच पाळीव प्राण्यांना वर्षभरासाठी लागणार्‍या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पक्ष्यांच्या किलबिलाटा मुळे निसर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave a Reply