दिल्ली शेतकरी आंदोलनाला बार्शीत मोटारसायकल रॅलीने पाठिंबा

बार्शी- – अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या  वतिने 26 जानेवारी 2021 वार मंगळवार रोजी दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले अंदोलन व टॅ्‍क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  हि रॅली काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्वक वातावरणात काढण्यात आली.  हि रॅली भगवंत मैदाण येथून निघून बार्शी शहराच्या मुख्य रत्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले.  यावेळी मोटारसायकवरून शेतकरी व कार्यकर्ते जय जवान जय किसान, तिन काळे कृषी कायदे रद्द करा अशा घोषणा देत होते.

यावेळी झालेल्या सभेत काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे, देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, परंतू कोणतीही तमा न बाळगता हे अंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल. यावेळी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे यांचेही भाशण झाले.

      हि रॅली यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅम्रेड बाळासाहेब जगदाळे, सुनील जावळी, आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघाचे काॅ. लहू आगलावे, काॅ. धनाजी पवार, काॅ. भारत भोसले, किसान मूळे, अनिल शिंदे, अनिस चे प्रा. ए.बी. कदम, विनायक माळी, ग्रामपंचायत संघटनेचे काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, रशिद इनामदार, बांधकाम कामगार संघटनेचे काॅ. अनिरूध्द नखाते, बालाजी शितोळे, शाफीन बागवान, संतोश मोहिते, आयटक महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे काॅ. प्रविण मस्तुद, परमेश्‍वर पवार, उमेश मदणे, सुधीर सेवकर, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशनचे काॅ. पवन आहिरे, भारत पवार, दिपक कोकाटे, तूषार कांबळे, अविराज चांदणे, बैक संघटनेच्या सरिता कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Leave a Reply