Breaking News

जेष्ठ नेते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजुबापु पाटील यांना पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने अर्पण केली भावपुर्ण श्रध्दांजली

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातील दोन दिग्गजांना पंढरपूर तालुक्यातील जनतेने गमावले… पंढरपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील काही जीवलग मातब्बर आकस्मिकपणे आमच्यातुन निघुन गेले..या सर्वांचं आकस्मिक जाणं खुपच वेदनादायी ठरलं.या सर्वांना पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्हा कडून भावपुर्ण श्रध्दांजली.

पंढरपूर/नामदेव लकडे -संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते, माजी आमदार, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि पंढरपूर तालुक्यातील सर्वसमावेशक राजकीय उभरतं नेतृत्व राष्ट्रवादी  चे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजुबापु पाटील यांना पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने पंढरपूर लाईव्ह कार्यालयात काल भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर शहराध्यक्ष श्रीकांत कसबे, उपाध्यक्ष उमेश टोमके,सदस्य डॉ. राजेश फडे, शंकर पवार, धीरज साळुंखे, डॉ. एस.एस.पाटोळे, तानाजी सुतकर, आदी उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!