जालना जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा डाळींब शेतीचा प्रयोग यशस्वी

जालना /विशेष प्रतिंनिधी – आपला देश कृषी प्रधान आहे.व तो राहवा हाच ध्यास घेऊन अनेक शेतकरी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे.यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेऊन शासकीय योजनाचा लाभ घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात .परंपरागत पध्दतीत नाविण्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती अजूनही उत्तम उत्पन्न देऊ शकते. हे सिध्द करुन दाखविले आहे.ध्येयवेड्या प्रदीप संदीप ठोंबरे या युवा शेतकऱ्याने .मराठवाड्यातील चांदई ठोंबरी ता भोकरदन जि.जालना येथील संदीप गणपत ठोंबरे हे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये कापूस ,मका,तूर,ज्वारी ,गहू आदी परंपरागत पिके घेत यातून घरखर्चा पूरते उत्पन्न मिळत होते .परंतु शेतीमध्ये पाहिजे तसा विकास नव्हता सोबत मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ यामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले होते .यावर मात करण्यासाठी मुलगा प्रदीप ठोंबरे यांनी नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याचा विचार केला.महाविद्यालयीन शिक्षण घेत शेतीची आवड म्हणून अनेक औषधी वनस्पतींची लागवड करुन त्याचे जतन करणे हा त्याचा छंद यामुळेच फळबागाची कल्पना सुचली याविषयी वडीला सोबत चर्चा करुन शेतीत करिअर घडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला वडीलांनी तो पंसत पडला त्याच विश्वासाने प्रदीपच्या खांद्यावर डाळींब शेतीची जबाबदारी सोपवली .सन.2018 मध्ये त्यांनी आपल्या मध्यम व हलक्या जमिनीत 12×10 फूट अंतरावर सुमारे 35 ते 40 गुंठ्यात सोलापूर लाल जातीच्या डाळींबाची लागवड केली.बागेचा पूर्वीचा अनुभव नव्हता मात्र कृषी अधिकारी ,अनुभवी शेतकरी यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी जिद्द ,चिकाटी व ज्ञान मिळवून बागाची निगा ,पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन केले. पहील्याच वर्षी पाच टन उत्पादन पर्यंत पोहचणे शक्य झाले.
सोलापूर लाल या वाणाला युरोपियन देशात मोठी मागणी आहे.यामुळे बाजारपेठेची माहिती घेऊन व्यवस्थित नियोजन करुन बागेची निगा राखली व डाळींब फळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केला.या फळांचा व दाण्याचा रंग गर्द लाल असतो यामध्ये झिंक ,लोह प्रमाण जास्त असल्यामुळे औषधी निर्मिती कंपन्यांची या वाणाला जास्त मागणी असते यामुळे इतर वाणा पेक्षा सोलापूर लाल ला भाव सुध्दा अधिकचा मिळाला .यावर्षी पाऊसचे प्रमाण जास्त होते. अलीकडच्याकाळात सतत पडणारा पाऊस यामुळे याचा परिणाम भगवा व इतर डाळींब बागावर मोठ्या प्रमाणात झाला.फळांचा रंग व पडझड टिकविण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागले .परंतु सोलापूर लाल या वाणावर इतर वाणापेक्षा अल्प प्रमाणात औषध फवारणी करावी लागली . तज्ञ व्यक्तीचे सल्ले व नियोजन यामुळे तूट कमी आली फळांचा दर्जा उत्तम ठेवण्यास मदत झाली भाव अधिकचा मिळाला व उत्पन्नही दुप्पट झाले.या यशस्वी प्रयोग मुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रदीप ठोंबरे यांच्या डाळींबाची बाग पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. याकरिता तालुका कृषी अधिकारी ,कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन मिळाले .शिक्षण सोबत शेती कडे सकारात्मक व व्यवसायाच्या दृष्टीने बघितल्यामुळे परिसरात सध्या या युवा शेतक-याची चर्चा होत आहे.या निमित्ताने शेतकरी बांधवांनी सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती घेऊन पारंपारिक शेतीसोबात नाविण्यपूर्ण शेती केल्यास भविष्यात शेतीला उत्तम दिवस येईल .व पुन्हा म्हणावे लागेल उत्तम शेती , मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे प्रदीप ठोंबरे या युवा शेतकऱ्याने आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply