जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

                       

1. मेष : दिनक्रम व्यस्त राहिला, तरी प्रसन्नता लाभेल. दोन्ही बाजू समजून घेऊन नवीन कार्यारंभ करणे हिताचे ठरू शकेल.

2. वृषभ : धन, संपत्तीबाबतीत लाभाचे योग जुळून येऊ शकतील. व्यवसायात प्रगतीकारक दिवस. नवीन करार पूर्णत्वास जाऊ शकेल.

3. मिथुन : महत्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या. निकाल आपल्या बाजूने लागतील. धावपळ करावी लागू शकेल. 

4. कर्क : आपल्या बोलण्याच्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नोकरीत उत्साही वातावरण राहील. राशी स्वामीचा भक्कम पाठिंबा लागेल. 

5. सिंह : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. आजचा दिवस भाग्यकारक असेल. शुक्राचा पाठिंबा मिळेल. 

6. कन्या : आपल्या कला गुणांमुळे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मोठ्या वस्तू खरेदीचा घाट घालाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा करू शकाल. 

7. तूळ : सामाजिक प्रतिष्ठा योग्य तऱ्हेने जोपासा. जवळच्या व्यक्ती आपल्याला आदर्श मानतील. आजचा दिवस समाधानकारक राहील. 

8. वृश्चिक : सरकारी कामे मार्गी लागतील. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील. 

9. धनु : स्वतःवरील विश्वास मोडून देऊ नका. व्यवहारात कोणी फसवणार नाही याची काळजी घ्या. काही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. 

10. मकर : नोकरीत मोठ्या संधी प्राप्त होतील. आपल्या तत्वांना मुरड घालू नका. आजचा दिवस परोपकार करण्यात आणि धावपळीत व्यतीत होऊ शकेल. 

11. कुंभ : सरकारी निर्णय आपल्या बाजूने लागतील. घरातील छोट्या मुलांची काळजी घ्या. भाग्याची साथ मिळेल. धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. 

12. मीन : जुनी सर्व कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी अति संघर्ष टाळा. घरात शुभ कार्याच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकेल. 

16 ऑक्टोबर 2020 

Leave a Reply