जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

1. मेष : घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. कर्जाचे व्यवहार टाळावेत. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. जुन्या मित्रांकडून उत्तम सहकार्य लाभेल. 

2. वृषभ : नातेवाईकांमध्ये व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी. 

3. मिथुन : घरातील स्त्री वर्गाचा सल्ला उपयोगी पडेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मोसमी आजार त्रस्त करू शकेल. 

4. कर्क : भाग्यकारक दिवस. आपण घेत असलेल्या मेहनत, परिश्रमाचे चीज होईल. मुलांप्रति असलेला विश्वास आणखी मजबूत होईल.

5. सिंह : संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक अशांतता, खिन्नता, विचलन शक्य. पालकांच्या शुभाशिर्वादामुळे दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल.

6. कन्या : निर्भिडपणे कार्यरत राहाल. साहस आणि पराक्रमाच्या जोरावर कार्य पूर्णत्वास नेण्यास सक्षम व्हाल. 

7. तूळ : शुभकारक दिवस. अधिकार आणि संपत्ती वृद्धिंगत होण्याचे संकेत. सेवाकार्य मनापासून कराल.

8. वृश्चिक : व्यापार विस्तारीकरणाच्या प्रयत्नांना यश येईलच, असे नाही. धैर्य आणि प्रतिभेचा वापर करून शत्रूवर विजय प्राप्त करू शकाल. 

9. धनु : परोपरकार, दानधर्म, पुण्य कार्य करण्याची इच्छा प्रबळ होऊ शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. 

10. मकर : नवीन कार्याची सुरुवात करायला आता उशीर करू नका. एखादी बहुमूल वस्तू प्राप्त होऊ शकेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल.

11. कुंभ : आवश्यकता असेल, तेथेच खर्च करावा. एखाद्या आप्तेष्टाकडून फसवणूक होण्याची शक्यता. छोटे प्रवास घडू शकतील. 

12. मीन : लोकांच्या सांगण्यावरून कोणत्याही गोष्टीचा मनात राग धरून बसू नका. अनेक दिवसांपासून मुलांसंदर्भात असलेला एखादा वाद निकाली लागू शकेल. 

19 ऑक्टोबर 2020 

Leave a Reply