Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. 

2. वृषभ : मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. धीराने कामे करावीत.

3. मिथुन : घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल.

4. कर्क : योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. 

5. सिंह : कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.

6. कन्या : विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. 

7. तूळ : घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. जुने वाद मिटू शकतील.

8. वृश्चिक : गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. 

9. धनु : उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. 

10. मकर : जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत.

11. कुंभ : कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. 

12. मीन : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील.

20 ऑक्टोबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!