Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

 दि. 3 सप्टेंबर 2020 

मेष : तुम्हाला माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. अचानक आपले ठरवलेले विचार बदलू नका. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहयोग प्राप्त होईल. 

 वृषभ : कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यकालीन योजनांवर चर्चा कराल. दिवसाच्या उत्तरार्धात मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

मिथुन : कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना लाभदायक दिवस.

 कर्क : आपल्या काटकसरीपणाचा फायदा झालेला दिसेल. दुसऱ्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल.

 सिंह : वडिलांकडून मोलाचे सहकार्य लाभेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नवीन करार करताना घाईने निर्णय घेणे टाळा. सारासार विचार लाभदायक ठरेल.

 कन्या : आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पडेल. दिनक्रम काहीसा व्यस्त राहील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

तूळ :  कामात सुलभता जाणवेल. दानधर्म कराल. मान, सन्मान वाढेल. प्रलंबित योजना मार्गी लागतील. मित्रमंडळींच्या भेटीने वा संवादाचे मन प्रसन्न राहील.

 वृश्चिक : कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका. मोठे धोके पत्करून कोणते कार्य करू नका. तीव्र इच्छा आणि संकल्पाच्या जोरावर सर्व आव्हानांचा यथोचित सामना कराल.

 धनु : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम काळ राहील. वकिलांबरोबरची कामे मार्गी लागतील. संमिश्र घटनांचा दिवस. दिवसाची सुरुवात समस्यांसोबत होईल.

 मकर : नवीन कामाचा तिटकारा करू नका. निष्काळजीपणा केल्यास व्यापारात तोटा सहन करावा लागेल. कार्यक्षेत्रातील कार्यप्रणालीत बदल संभवतो.

 कुंभ : आपला विचार लोकांना बोलून दाखवल्यास फायदा होईल. बौद्धिक व्यापार करणाऱ्यांना दिवस चांगला. आर्थिक आघाडी सक्षम करणारा दिवस.

 मीन : आपल्या ईश्वर भक्तीमुळे दुसऱ्यांचे प्रेम मिळवाल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी लढा सुरू करा. विशेष धनलाभाचे योग. उत्पन्नाच्या साधनात वृद्धी होऊ शकेल. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!