मेष : मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवस जाईल
वृषभ : घरातील कामांमध्ये व्यस्त व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.
मिथुन : बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.
कर्क : आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
सिंह : प्रेमींना व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.
कन्या : स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
तूळ : उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.
वृश्चिक : आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.
धनु : धार्मिक गोष्टीत दिवस घालवल . वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.
मकर : कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.
कुंभ : मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.
मीन : आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.
24 ऑक्टोबर 2020