जऊळका या गावात ओढ्याचे नाल्याचे पाणी शेतात घुसून पिकाचे मोठे नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे –  सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक २०/ते२१/९/२०२० सकाळी पहाटे पर्यंत मुसळधार पावसाने धुमशान घातला आणि आजसुद्धा या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चालूच आहे .असून जऊळका गावाला त्याचा फटका बसलेला आहे. शेतातील ओढे नाले तुडुंब भरल्याने पाणी शेतात गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.जिवापाड जपलेली पिक डोळ्यादेखत वाहून गेले आता जागायचा कस हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे याअगोदर मूग हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने  शेतकऱ्याकडे फक्त आता सोयाबीन आणि कपाशी राहिलेली होती ती पण आता पूर्ण खाली पडल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा धक्का बसलेला आहे शेतकऱ्याचे मुख्य पीक कपाशी . मूग.आणि सोयाबीन आहे आता सर्वच गेल्याने जऊळका येथील शेतकरी दामोधर सांगळे, अशोक सांगळे, समाधान बुधवत, स्वप्निल सांगळे, यांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या ए बी एस न्यूज  इकडे व्यथा मांडली आणि आमचे पंचनामे करून आम्हाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.

Leave a Reply