चक्क घोड्यावरून येत बजावला मतदानाचा हक्क

राजेशाही थाटात बजावला लोकशाहीचा अधिकार

मंगळवेढा/विशेष प्रतिनिधी – पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले . या मतदार संघातील  मारापुर ता. मंगळवेढा येथील कुणाल भागवत माने (वय-३५ )यांनी माने फार्म पासुन मारापुर मतदान केंद्र पर्यंत 8 कि.मी घोड्यावर येवुन मतदानाचा हक्क बजावला. लोप पावत चाललेल्या दळणवळणाच्या व्यवस्थेचा छंद म्हणून त्यांनी आपल्या फार्म मध्ये ४ प्रकारच्या जातीवंत घोड्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे माने हे डॉक्टरपेशा असणाऱ्या कुटुंबातील आहेत.पुण्यासारख्या विकसित भागामध्ये वास्तव्यास असुन ही ग्रामीण भागाची आपली नाळ कायम जोडली आहे.
Leave a Reply