गडचिरोलीत पोलीस – नक्षलवाद्यां चकमकीदरम्यान पोलिसांकडून मोठी कारवाई

                                                                                                                                                                             वृतसंस्था – गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारवाली  झालेल्या चकमकीमध्ये १३ नक्षलवादी मारले गेले आहेत.

गडचिरोली पोलीस महाउपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की चकमक सकाळी पाच वाजता झाली.

 चकमकीच्या वेळी नक्षली एटापल्ली कोटमी गावाच्या जंगलामध्ये बैठक घेण्यासाठी एकत्रित आले होते. त्यांनी सांगितलं  की गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र पोलीस च्या c-60 बटालियन शोध मोहीम हाती घेतली होती.

पुढे त्यांनी सांगितलं की नक्षलवादयांनी पोलिसांना बघताच गोळीबार सुरू केला. पोलिसांनी जबाबी कारवाईमध्ये गोळ्या चालवल्या यादरम्यान १३ नक्षलवादी मारले गेले.

त्यांनी सांगितले की जंगलामध्ये माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक दिवस आधीच आम्ही शोधमोहीम सुरू केली होती.आतापर्यंत आम्ही 13 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शोध मोहीम सुरू आहे.

Leave a Reply