कृषीदूत कंपनीकडून पिंपरी (सा) ग्रामपंचायतिला सॅनिटायझर स्टँड भेट

बार्शी /शुभम काशिद -बार्शी तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत कृषिदूत बायो हर्बल कंपनी,नाशिक तर्फे पिंपरी (सा) ग्रामपंचायतीस सामाजिक जाणीवेतून सॅनिटायझर स्टँड भेट देण्यात आले.यावेळी कृषिदूत कंपनी चे प्रतिनिधी अलीम मुजावर,औषध विक्रेते युवराज काटमोरे,द्राक्ष बागायतदार धनंजय काशीद,द्राक्ष बागायतदार रामविजय वायकर,समाधान सुतार,ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश काशीद उपस्थित होते.

Leave a Reply