कुनसावळी येथील शेतकरी संकटात

तुळजापूर /अक्षय वायकर – पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कष्टकरी बळीराजा आता पाऊस नको रे बाबा असं म्हणायला लागला आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून  पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामाची  आलेली पीक पाण्याखाली गेली आहे. अति पावसाने पिके पाणी लागून पिवळी पडू लागली आहेत तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 शेतात काढणीला आलेली पीक आता पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभ्या केलेल्या पिकांचे आता डोळ्यासमोर नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा हात पुढे करण्याचे मागणी शेतकरी करत आहेत.

Leave a Reply