कवठे एकंद ग्रामपंचायत निवडणुकीत या वर्षी तिरंगी लढत.

सांगली/सुहेल सय्यद

      तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या वेळी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या गावात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन ताई पाटील, तसेच भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या आपापला स्वतंत्र गट आहे. शेतकरी कामगार पक्षाचे मानणारा मोठा गट आहे. 

   पूर्वी पासून या ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. 2010 च्या निवडणुकीमध्ये मध्ये तत्कालीन मंत्री आर आर आबा पाटील गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही ग्रामपंचायत शेकाप काढून खेचून घेतली. गतवर्षीच्या निवडणुकीत आर आर आबा पाटील यांच्या निधनानंतर यांच्या पश्चात निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस  11 जागा जिंकून पुन्हा ग्रामपंचायत सत्ता काबीज केली. भाजप 3 व शेकापचे 1 सदस्य निवडून आले.

     या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आर ‘आर आबा पाटील ग्रामविकास पॅनल’ माध्यमातून व यांच्या विरुद्ध शेकाप व भाजप युती करत ‘कवठेएकंद ग्रामविकास पॅनल’ आणि तिसरे पॅनल स्वाभिमानी राष्ट्रवादी व कांग्रेस, वंचित बहुजन आघाडी, ने ‘आबा दादा महाविकास आघाडी पॅनल’ असे  आहेत. 

     काही लक्षवेधी लढती आहेत या मध्ये..

वार्ड क्रमांक 2 मध्ये काँग्रेस प्रणित आघाडी च उमेदवार विजय माने व भाजप शेकाप युतीचे सुनील शिरतोडे व राष्ट्रवादी चे सचिन लवटे, अपक्ष सचिन जाधव हे देखील मैदानात असल्यामुळे ही लक्षवेधी लढत आहे.

वार्ड क्र 3 मध्ये विद्यमान सरपंच ज्योती गुरव व माझी सरपंच राजश्री पावशे.

वार्ड क्र 5 मध्ये माजी उप सरपंच महावीर चौगुले व माजी सरपंच दिपक जाधव. या सर्व लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

      या वेळी 17 जागेसाठी एकूण 53 उमेदवार उभे आहेत. 9 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. निवडणूक तिरंगी असल्यामुळे. मतदार कौल पुन्हा राष्ट्रवादीला देतात की? भाजप-शेकापच्या युतीला देते? जर त्रिकुंश परिस्थिती निर्माण झाली काँग्रेस मित्रपक्ष किंगमेकर च्या भूमिकेत येतील?

 नक्कीच मतदारमध्ये याची उत्सुकता आहे.

Leave a Reply