कर्मवीर ग्रंथालयाच्या वतीने डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती साजरी


बार्शी/प्रतिनिधी:गोरगरिब,दीनदलित,शोषित, वंचित,कष्टकरी,कामगारांचे कैवारी,थोर कायदेतज्ज्ञ,भारतीय घटनेचेशिल्पकार,विश्वभूषण,युगपुरुष,महामानव,प्रज्ञासूर्य,भारतरत्न,बोधिसत्व,परमपूज्य डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात सर्व नियम व अटीचे पालन करीत अगदी साध्या पध्दतीने पणं उत्साहात साजरी करण्यात आली.

   

प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मा.बप्पासाहेब सुतार,मा.सतीश पाचकुडवे,वाचनप्रेमी वैभव जगताप,प्रेम अग्रवाल आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी या औचित्याने यथोचित मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.

Leave a Reply