Breaking News

आरंभ संस्थेच्या वतीने PMT कर्मचाऱ्यांचा सत्कार

प्रतिनिधी/पुरूषोत्तम विष्णु बेले -भेकराई नगर व शेवाळवाडी येथील बस डेपोमधील पीएमटी कर्मचारी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता प्रवाशांची सेवा करीत आहेत. आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यकारणी सदस्य मयूर महाबोले यांच्या हस्ते या सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नागनाथ कारंडे पीएमटी डेपो मॅनेजर भेकराईनगर व शेवाळवाडी, नितीन निकंबे व पीएमटी चालू झाल्यापासून वाहक, चालक परमेश्वर कराड एकही सुट्टी न घेता ड्युटीवर कार्यरत होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात डॉक्टर, पोलीस सफाई कामगार यांच्यासोबत आम्हा कर्मचाऱ्यांची दखल घेत आरंभ संस्थेनी आम्हाला यापुढेही सातत्याने काम करण्यास प्रोत्साहन दिले. याबद्दल भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी आरंभ संस्थेचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!