धनश्रीसोबतचे नाते तुटले? युझवेंद्र चहलने दिली पहिली प्रतिक्रिया


भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात कदाचित काही ठिक नसल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. धनश्री वर्माने इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून तिचे आडनाव धनश्री वर्मा चहलवरून बदलून धनश्री वर्मा केल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

धनश्री वर्माने ‘चहल आडनाव’ काढून टाकल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली. धनश्री तिचे दोन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘एक राजकुमारी कायम तिच्या वेदनांचं शक्तीत रुपांतर करेल.’ या पोस्टद्वारे तिने वेदना होत असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यानंतर, युझवेंद्र चहलने एका  इन्स्टा स्टोरीमध्ये टाकलेल्या फोटोमुळे त्याचे चाहते आणखी गोंधळात सापडले होते. या फोटोमध्ये एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे, असे म्हटले होते.

त्यानंतर युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक पोस्ट केली आहे. धनश्री वर्माच्या इन्स्टा पोस्टनंतर दोघांमध्ये काही वाद झाला का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर चहलने सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

युझवेंद्र चहलने त्यांच्या एका इन्स्टा स्टोरीद्वारे त्यांच्या नात्यासंदर्भातील बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्या येथेच संपवा. तुम्हाला जर काही माहित नसेल,तर यासंदर्भात पुढे जाऊ नका,” असे चहलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

yuzvendra Chahal reacted to the news of breaking up with Dhanashree Verma

दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 3 महिन्यांच्या नात्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर 22 डिसेंबर 2020 मध्ये विवाहाच्या अतूट बंधनात बांधले गेले. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे. धनश्री वर्माचे नृत्याशी संबंधित एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलचे 26 लाखांहून अधिक सदस्य आहेत. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते. धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. युझवेंद्र चहलसोबत डान्सचे व्हिडिओही शेअर करत असते.Source link

Leave a Reply