Headlines

युजवेंद्र चहलची राजस्थान रॉयल्सला मोठी धमकी, म्हणाला ‘मी अकाऊंट…’

[ad_1]

मुंबई : मुंबई आणि पुण्यामध्ये 26 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ असणार आहेत. सर्व खेळाडू आपल्या संघाशी जोडले गेले आहेत. खेळाडूंनी आपलं ट्रेनिंग सुरू केलं आहे. राजस्थान संघाला यंदाच्या हंगामात चांगले दिवस येतील अशी सर्वांनाच आशा आहे. 

राजस्थान संघावर संकट? 

राजस्थान संघाचं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं की काय अशी एक शंका उपस्थित होत आहे. हे अकाऊंट युजवेंद्र चहलने हॅक केलं की काय अशी चर्चा आहे. कारण युजवेंद्रने तशी धमकी दिली होती त्यामुळे ही चर्चा रंगली आहे. 

नेमकं काय घडलं? 

राजस्थान संघाने युजवेंद्रचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये युजवेंद्र आपल्या टीमसोबत जोडला गेल्याचं दिसत आहे. त्याचा फोटो राजस्थान संघानं ट्वीट केला. त्यावर युजवेंद्रने मी ट्वीटर अकाऊंट हॅक करणार अशी धमकी दिली. 

राजस्थान संघाच्या ट्वीटर अकाऊंटवर पुढच्या काही मिनिटांत एक फोटो आला. युजवेंद्रने राजस्थानची जर्सी घातली होती. राजस्थानचा नवा कर्णधार असं कॅप्शन देण्यात आलं होतं. या ट्वीटनंतर मोठी खळबळ उडाली. सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. 

नेमकं काय आहे सत्य? 

राजस्थान संघाने हे मिम तयार करत युजवेंद्रचा डाव त्याच्यावरच उलटवला आहे. राजस्थान संघ ट्वीटरवर त्याच्या मिम्ससाठी प्रसिद्ध आहे. आता या नव्या मिमची खूपच चर्चा आहे. राजस्थान संघाच्या ट्वीटर अकाऊंटवर युजवेंद्र चहलचा जर्सी घातलेला फोटो अपलोड करण्यात आला आहे. 

राजस्थान संघाचं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं नाही. तर मजेत हे ट्वीट करण्यात आलं आहे. युजवेंद्र चहल आणि राजस्थान संघाची ट्वीटरवर ही मस्करी सुरू असल्याचं सत्य समोर आलं आहे. 10 हजारहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्वीट केला आहे. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन असणार आहे. 

युजवेंद्र चहल यंदा राजस्थान संघाकडून खेळताना दिसणार आहे.  6.50 कोटी रुपये देऊन राजस्थान संघाने युजवेंद्रला आपल्या संघात घेतलं आहे. 2021 मध्ये युजवेंद्र बंगळुरू संघाकडून खेळला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *