युवराज सिंगच्या बायकोचा बदलेला लूक पाहून चाहते चिंतेत; का झाली अभिनेत्रीची अवस्था?


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑलराउंडर  खेळाडू युवराज सिंह सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 मध्ये खेळत आहे. वर्षाच्या सुरुवातीला युवराज आणि हेजल कीच पालक बनले आणि त्यांनी फादर्स डेच्या दिवशी त्यांच्या मुलाचं नाव उघड केलं. युवराज सिंगचा मुलगा ‘ओरियन’ सोशल मीडियावर खूप पसंत केला जातो. यावेळी हेजल कीच आणि ओरियनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

युवीची पत्नी हेजल आणि त्यांचा मुलगा ओरियन हे मुंबई विमानतळावर नुकतेच स्पॉट झाले. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हेजलने ओरियनला घेतलं आहे. आणि ओरियन झोपलेला दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडिओ पाहून चाहते मात्र चिंता व्यक्त करत आहेत. एका युजर्सने अभिनेत्रीच्या व्हिडिओवर अशी कमेंट केली आहे की, अभिनेत्रीची अशी अवस्था का झालीये? तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, अभिनेत्रीचा लूक एवढा का बदलला आहे? तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, काळजी वाटतेय तुला अशा अनेक युजर्सने अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चिंता व्यक्त केलीये. तर अनेकांनी मात्र तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केलाय. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

काही दिवसांपूर्वी युवराज सिंगने 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत 6 चेंडूत 6 षटकार मारताना आपल्या मुलाची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.Source link

Leave a Reply