Headlines

yuva-sena-varun-sardesai-attacks–bjp-eknath-shinde on bmc elecation | Loksatta

[ad_1]

एकनाथ शिंदेनी शिवसेनेबरोबर केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यातून आता अगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि भाजपानेही कंबर कसली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदे गट, भाजपा आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाईंनी मनसे, भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्हावी. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असा खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर…”, अतुल भातखळरांचा हल्लाबोल; म्हणाले, “जनाब सेनेचा कांगावा…”

मुंबई महानगरपालिका निवडणुक शिवसेना जिंकणार…

शिवसेनेच्या निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तुळजापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी अभियानाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ निवडणूक लढणार नाही तर जिंकणार आहोत, असा विश्वास सरदेसाईंनी व्यक्त केला.

मनसे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसेत वाढत्या जवळीकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी गणेशोत्सव काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. अजूनही या भेटीगाठींचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा- Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार

मनसे आणि शिंदे गटात जवळीक

शिंदे गट आणि मनसे युतीबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठ विधान केलं आहे. मनसे आणि शिंदे गटामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत. मात्र, युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेचं निर्णय घेतील असंही अमित ठाकरे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *