Headlines

युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं

[ad_1]

मुंबई : युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात सोनं हजार रुपयांनी महागलं तर चांदीतही झळाळी आहे. सोन्या चांदीचे भावही कडाडले आहेत.

दर तोळ्यामागे सोन्याचा दर एक हजारांने वाढलाय. तर चांदीही किलोमागे हजार रूपयांनी महागलीय. सोनं ५३ हजार ६५० रूपये तोळा झालंय. तर चांदी ७० हजार २८२ रूपयांवर पोहोचलीय.

दरम्यान युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने सोन्याची मागणी कमालीची वाढलीय. 

रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारताला

-डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
-आज एका डॉलरचा भाव 76 रुपये 96 पैसे
-आतापर्यंतच्या नीच्चांकी पातळीवर पोहोचला रुपया

रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात कमालाची पडझड सुरू आहे. सेन्स्केक्स 1600 अंशांनी तर निफ्टी जवळपास 400 अंकांनी कोसळला. रशिया युक्रेन युद्धामुळे ग्लोबल मार्केटमध्ये पडझड झालीय. आशियाई बाजार 2.5% ते 3% कोसळले आहेत. भारतीय बाजारतही विक्रीचा जोर कायम आहे. 

दुसरी बातमी पाहूयात शेअर बाजारासंदर्भात… आठवड्याची सुरूवात शेअर बाजारात मोठ्या पडझडीने होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज पुन्हा मोठ्या घसरणीचे संकेत आहेत. राहण्याची शक्यता आहे. 

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसू लागलाय…2008 नंतर कच्च तेल सर्वोच्च पातळीवर पोहोचलंय…कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 129 डॉलर वर पोहोचलेयत…आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा टप्पा आहे…संध्याकाळी साडेपाच नंतर केव्हाही पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे… 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *