Breaking NewsPolitics

आपले जवान शहीद होत आहेत आणि तुम्ही टी-ट्वेंटी खेळणार ? असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांना केले लक्ष्य

हैद्राबाद – एआयएमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले की नरेंद्र मोदी दोन गोष्टीवर कधीच काही बोलत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती बाबत आणि दुसरे लडाखमध्ये आमच्या सीमेत घुसलेल्या चिनी सैनिकांवर. हैदराबाद मधील एका जाहीर सभेत ओवैसी म्हणाले पंतप्रधान मोदी चीन बद्दल बोलायला घाबरतात

ओवैसी म्हणाले पाकिस्तान काश्मीर मध्ये दररोज भारतीय सोबत टी-ट्वेंटी खेळत आहे. काश्मीर खोऱ्यात काश्मिरी खोर्‍या बाहेरील नागरिकांच्या हत्या होत आहेत. हे केंद्रातील भाजप सरकारचे अपयश आहे. बिहार मधील गरीब आणि स्थलांतरित मजूर मारले जात आहेत . या हत्या लक्ष करून केल्या जात आहेत. गुप्तचर विभाग आणि गृहमंत्री अमित शहा काय करत आहेत ? पुलवामा आणि श्रीनगर मध्ये दहशतवाद्यांनी अलीकडे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका मजुराची हत्या केली आहे. गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांनी आठ ते नऊ नागरिकांना ठार केले आहे यामुळे घाटीत भीतीचे वातावरण आहे.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!