Headlines

तुमचे Facebook, Instagram, Twitter हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ? असे राहा सेफ

[ad_1]

नवी दिल्ली:Social Media Accounts: आजकाल हॅकर्स अधिक सक्रिय झाले असून सतत युजर्सचे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात तुम्ही देखील Twitter, Facebook किंवा इंस्टाग्राम सारखे कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर, तुम्ही देखील या हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकता. हे टाळायचे असल्यास अधिक सावध राहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ ट्विटर खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला एक मजबूत पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. मजबूत पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरे, लहान अक्षरे, विशेष अक्षरे आणि अंकीय अक्षरे यांचे कॉम्बिनेशन असले तर चांगले. तुमचा फोन नंबर, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचे नाव यासोबत पासवर्ड जोडणे टाळा.

वाचा: ४३ हजारांच्या One Plus स्मार्टफोनवर सर्वात मोठी ऑफर, १५ हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी

तुम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा पर्यायही वापरू शकता. यात Account Login करण्यासाठी पासवर्ड टाकल्यानंतर फोन किंवा ई-मेलवर तुम्हाला एक कोड पाठवला जातो, तो टाकल्यानंतरच तुम्ही लॉगिन करू शकता.

Facebook, Instagram च्या सुरक्षिततेसाठी या टिप्स फॉलो करा:

यासाठी मजबूत पासवर्ड तयार करा. तसेच, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी दर सहा महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलत राहा.याशिवाय, तुम्हाला तुमच्या Facebook आणि Instagram वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधाही मिळते. तर फेसबुकवर तुम्ही एक्स्ट्रा सेटिंग्ज वापरून प्रोफाइल लॉकचा पर्याय अवलंबू शकता.

वाचा: बिनधास्त वापरा AC, Heater ! सरकार २५ वर्षांपर्यंत वीज देणार मोफत, असे करा Online Apply

तसेच, तुम्ही तुमच्या खात्याबद्दल कोणती माहिती सार्वजनिक करू इच्छिता आणि कोणती नाही हे निवडू शकता. Facebook खात्याच्या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी ते शोध इंजिन परिणामांमधून काढून टाका. यासोबतच अलर्ट नोटिफिकेशन चालू ठेवा, जेणेकरून कोणी Hacking चा प्रयत्न केला तर त्याची माहिती लगेच मिळेल.

ट्विटर, एफबी, इन्स्टा अकाउंट्स रिकव्हर करा

तुमचे ट्विटर, फेसबुक किंवा इंस्टाग्राम खाते हॅक झाल्यास ते नेहमी रिकव्हर करण्याचा पर्याय असतो. यासाठी तुमचा फोन नंबर आणि ईमेल आवश्यक आहे. ज्यावर तुम्हाला पासवर्ड रीसेट करण्याची लिंक किंवा कोड पाठवला जातो. यासाठी तुम्ही Forgot Password हा पर्याय वापरू शकता.

वाचा: जबरदस्त स्पीड देणारे जगातील टॉप १० Fastest Smartphones, स्पीड सोबत इतर फीचर्सही दमदार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *