युवा गोलंदाज टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार


मुंबई : देशात असे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून यश गाठले आहे. अशाच खेळाडूंच्या पक्तीत आता आणखीण एक खेळाडू जोडला जाणार आहे. कारण हा खेळाडू यंदाचा टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. तसेच हा खेळाडू टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकून देण्यास प्रमुख दावेदारही मानला जात आहे. हा खेळाडू कोण आहे? त्याची संघर्ष गाथा काय आहे ते जाणून घेऊयात. 

ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात होतेय. या वर्ल्डकपसाठी अनेक संघानी त्यांचा त्यांचा स्क्वॉड जाहिर केला आहे. त्याचप्रमाणे टीम इंडियाने (team india) देखील त्यांचा संघ जाहिर केला आहे. या संघाच्या प्रशिक्षण शिबिरात उमरान मलिकसह तीन अतिरिक्त बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे.  कुलदीप सेन, (Kuldeep sen) चेतन साकारिया आणि मुकेश चौधरी हे ते नेट बॉलर असणार आहेत. 6 ऑक्टोबरला ते पर्थला रवाना होणार आहेत. 

कोण आहे कुलदीप सेन? 
कुलदीपचा (Kuldeep sen)  जन्म 28 ऑक्टोबर 1996 रोजी रीवा येथील हरिहरपूर गावात झाला. त्याचे वडील रामपाल सेन यांचे सिरमौरमध्ये सलूनचे दुकान आहे. कुलदीपला दोन भाऊ आहेत आणि तो सर्व भावांमध्ये मोठा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ राजदीप सेन मध्य प्रदेश पोलिसात आहे आणि तिसरा भाऊ जगदीप सेन कोचिंग चालवतो. तसेच तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. 

टीम इंडियात अजूनही संधी नाही
आयपीएल 2022 पासून कुलदीप (Kuldeep sen) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण अजूनतपर्यंत टीम इंडियाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले नाहीयेत. तर त्याच्याऐवजी उमरान मलिक, आवेश खान, अर्शदीप सिंग या गोलंदाजांना आयपीएल 2022 नंतर टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. कुलदीपने आयपीएल सामन्यांमध्ये 149 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. मात्र लयीत असूनही कुलदीप सेनचं टीम इंडियात (Team India) सिलेक्शन झालं नाही. 

इराणी चषकात तुफान गोलंदाजी 
इराणी चषक 2022 मध्ये रेस्ट ऑफ इंडिया (Rest of India) आणि सौराष्ट्र (Saurastra) यांच्यात सामना सुरु आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशी फलंदाजी करताना सौराष्ट्र (Saurastra) संघाचा पराभव झाला. रेस्ट ऑफ इंडियाच्या गोलंदाजांनी सौराष्ट्र संघाच्या बॅट्समनला क्रिजवर टीकूच दिले नाही. 

रेस्ट ऑफ इंडियाकडून (Rest of India) कुलदीप सेनने (Kuldeep sen) उत्कृष्ट खेळ दाखवला. कुलदीपने सौराष्ट्राविरुद्ध 7 ओव्हर टाकले, ज्यामध्ये त्याने एक मेडन ओवर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने चेतेश्वर पुजारा, प्रेराक मंकड आणि पार्थ भट्टची अशा तीन विकेट घेतल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5.85 होता. 

कारकिर्द
कुलदीपने (Kuldeep sen)  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 44 विकेट घेतल्या आहेत. आशिया कप 2022 मध्ये त्याचा नेट गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आता चाहते त्या क्षणाची वाट पाहत आहेत, जेव्हा कुलदीपला टीम इंडियाच्या (Team India) संघात स्थान मिळेल आणि तो आपला पदार्पण सामना खेळू शकेल.Source link

Leave a Reply