‘तुमसे ना हो पाएगा’…KKR विरूद्धच्या खेळीनंतर चाहतेच Virat Kohli वर संतापले


मुंबई : आयपीएल 2022 च्या सहाव्या सामन्यात RCB आणि KKR या दोन टीम्समध्ये सामना रंगला होता. या सामन्यातही विराट कोहलीली काही साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात विराट कोहलीने अवघे 12 रन्स करत आपली विकेट गमावली. विराट कोहलीच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत. 

आरसीबीने केकेआरवर 3 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने बंगळुरुला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान बंगळुरुने अखेरच्या ओव्हरमधील 4 चेंडू राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मात्र या सामन्यातही कोहलीला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सामन्यानंतर अनेकांनी विराटला ट्रोलही केलं आहे. यामध्ये एकाने सेंच्युरीबाबत, तुझ्याकडून नाही होणार असा मीम केला आहे. तर एका युझरने विराट कोहली आरसीबी साठी पनवती असल्याचं म्हटलंय. मात्र दुसरीकडे कोलकाताच्या गोलंदाजांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक केलं जात आहे.

कोलकाताच्या गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण इतक्या लो स्कोअरिंग सामन्यातही या गोलंदाजांनी आपल्या धावसंख्येचा फार शानदारपणे बचाव करत बंगळुरुला विजयासाठी अखेरच्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. 

कोलकाताकडून  टीम साऊथीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.Source link

Leave a Reply