नेटफ्लिक्सने भारतात पासवर्ड शेअरिंग केले बंद
Netflix खाते आयडी पासवर्ड शेअरिंग बंद करण्यात आले आहे. यावेळी कंपनीने म्हटले आहे की खाते शेअरिंग फक्त एकाच घरात करु शकणार आहात. म्हणजेच, जर तुम्ही एकाच ठिकाणी एकत्र राहत असाल तर तुम्ही तुमचे खाते तेथील लोकांशी शेअर करू शकता. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या घराच्या ठिकाणी नोंदणीकृत Netflix खाते वापरत असाल, तर तुमचे डिव्हाइस महिन्यातून एकदा तरी तुमच्या होम लोकेशनशी कनेक्ट होणे आवश्यक आहे. केवळ असे केल्याने तुम्ही तुमचे Netflix खाते वापरु शकाल. होम लोकेशनशी कनेक्ट होण्य़ासाठी आयपी अॅड्रेसची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे करू शकत नसाल किंवा तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त काळ कुठेतरी जात असाल, तर तुम्हाला आता नेटफ्लिक्ससाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
तसंच जर तुम्ही तुमच्या मित्राचे खाते वापरत असल्यास, तुम्हाला दुसरे खाते तयार करण्यास किंवा तुमच्या घराचे लोकेशन अपडेट करण्यास सांगितले जाईल. हे नवीन धोरण २० जुलैपासून लागू करण्यात आले आहे. हळूहळू देशभरात हे लागू होणार आहे. Netflix वापरकर्त्याचे प्राथमिक लोकेशन त्यांचा IP अॅड्रेस, डिव्हाइस आयडी, वाय-फाय नेटवर्क आणि अकाऊंटच्या अॅक्टिव्हिटीद्वारे ट्रॅक करेल. युजर्सना लवकरच या नवीन पॉलिसीबद्दल सर्व काही सांगितले जाईल. यासाठी कंपनीने यूजर्सना मेल देखील करण्यास सुरुवात केली आहे.
वाचा : iPhone 15 नंतर लगेचच लाँच होणार गुगलचा Pixel 8 Pro, फीचर्स झाले लीक