“याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल! | His brain rotted ramdas kadam on shivsena leader bhaskar jadhav rmm 97गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टोकदार शब्दांत टीका केली जात आहे. अलीकडेच भास्कर जाधव यांनी दापोली येथील आक्षेपार्ह भाषणावरून रामदास कदमांचा समाचार घेतला होता. रामदास कदम यांनी संबंधित सभेतून उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. या घडामोडीनंतर रामदास कदम यांनी पुन्हा भास्कर जाधवांवर पलटवार केला आहे.

भास्कर जाधव यांचा मेंदू सडला असून डोकं नासलं आहे, त्यामुळे नासलेल्या डोक्यातून नासलेले विचार येत आहेत. माझ्यासारखा माणूस त्यांना काहीही किंमत देत नाही, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे. ते रत्नागिरीत ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील” ‘त्या’ विधानावरून भास्कर जाधवांची खोचक टीका

कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आणखी संघर्ष पाहायला मिळणार आहे का? असा प्रश्न विचारला असता रामदास कदम यांनी भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. भास्कर जाधवांची औकात आहे का? आपण आपल्या बरोबरीच्या माणसासोबत संघर्ष करत असतो. आता मी नारायण राणेंसोबत संघर्ष केला, मी कोकणात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. पण भास्कर जाधवांची एवढी औकात आहे का? असा सवाल रामदास कदमांनी विचारला आहे.

हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, भास्कर जाधव हा कालचा गद्दार आहे, त्याने शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खूपसून पुन्हा शिवसेनेत आला. तो गद्दार मला शिकवणार का? त्याचा मेंदू सडला आहे आणि डोकं नासलं आहे. नासलेल्या डोक्यातून नासलेले विचारच बाहेर येणार, याला कोकणात कोण विचारतं? माझ्यासारखा माणूस तर याला काहीही किंमत देत नाही, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे.Source link

Leave a Reply