Headlines

‘या’ व्यक्तीने खासगी प्रश्न विचारताच भडकली Hemangi Kavi, म्हणाली…

[ad_1]

मुंबई : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडत असतात. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi). आपल्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीनं चाहत्यांचं मनोरंजन करणारी हेमांगी पुन्हा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आता हेमांगीने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘Festive Ready!’ असं लिहिलं आहे. 

तिच्या फोटोवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. पण कमेंट बॉक्समध्ये एका चाहतीने हेमांगीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे अभिनेत्री भडकली. 

हेमांगीच्या फोटोवर युजरने अभिनेत्रीला ‘हेमू तू आई कधी होणार…’ असा प्रश्न विचारला. यावर हेमांगी म्हणाली, ‘तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे. आणि तो हा असा तुमच्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीने येणं चुकीचं आहे.’

हेमांगी पुढे म्हणाली,  ‘मी तुमची ही कमेंट इग्नोर करू शकते. पण मला तुम्हाला आणि आपल्या सारख्या लोकांना कळवायचंय की, तू लग्न कधी करणार, तुमचा घटस्फोट झालाय का?, तू आई कधी होणार, तुम्हाला किती मुलं आहेत, तुमचा पगार किती आहे, हे असले पर्सनल प्रश्न कधी कुणालाही विचारु नये’. धन्यवाद!”

सध्या हेमांगीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. हेमांगी कायम स्वतःला खटकलेल्या गोष्टींवर स्वतःचं मत मांडत असते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी फारसं महत्त्व देत नाही.

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *