‘या’ खेळाडूमुळे काव्या मारनच्या चेहऱ्यावर आलं पुन्हा हसू, पाहा व्हिडीओ


मुंबई : केनच्या नेतृत्वामध्ये हैदरबाद टीमने तिसरा विजय आपल्या नावावर केला. आयपीएलच्या हंगामातील हा तिसरा विजय आहे. तर कोलकाताचा तिसरा पराभव आहे. विजयाची हॅट्रिक साजरी करताना खेळाडूंसोबतच मिस्ट्री गर्ल काव्य मारनच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता. 

कोलकाता टीमच्या हातून हैदरबादच्या धडाकेबाज खेळाडूनं विजय खेचून आणला आणि काव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. काव्याच्या चेहऱ्यावर त्याने पुन्हा हसू आणलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काव्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तो खेळाडू कोण होता जाणून घेऊया.

कोलकाताकडून नितीश राणा आणि आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीनं 175 धावा केल्या. हैदराबादकडून 3 गडी गमावून 176 धावांचं लक्ष्य अगदी सहज पूर्ण केलं. हैदराबादने 7 विकेट्स राखून कोलकातावर दणदणीत विजय मिळवला आहे. 

हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने 71 तर एडन मार्करमने 68 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या एका सिक्सने हैदराबाद टीमला विजय मिळाला. एडनने सिक्स ठोकला आणि काव्याच्या चेहऱ्यावरील टेन्शनचा सूर एका क्षणात बदलला. 

मिस्ट्री गर्ल काव्या 2 पराभवांमुळे खूप नाराज होती. पण तिच्या चेहऱ्यावरी सुंदर स्माईल एडनने पुन्हा आणली आहे. विजयाच्या हॅट्रिकचा आनंद काव्या मारन साजरा करताना दिसली. 

एडनने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 36 बॉलमध्ये 68 धावा केल्या. त्याने शेवटच्या सिक्स ठोकून हैदराबादला जो विजय मिळवून दिला त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याच्या योगदानामुळे टीममधील खेळाडू आणि काव्या मारन दोघंही त्याच्यावर खूप खूश आहेत. Source link

Leave a Reply