Headlines

‘या’ कारणामुळे टायगर श्रॉफला कधी डेट करणार नाही, चारचौघात अभिनेत्रीची अजब प्रतिज्ञा

[ad_1]

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) हा शो लोकप्रिय टॉक शोपैकी एक आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी त्यांच्या खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेक मजेदार खुलासे करतात. आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि अभिनेता टायगर श्रॉफनं (Tiger Shroff) हजेरी लावणार आहेत. यावेळी हे दोघं फक्त त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगत नाही तर करण जोहरची (Karan Johar) मस्करी करताना दिसत आहेत. 

कृतीनं करण जोहरच्या शोमध्ये खुलासा केला की तिनं ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी ऑडिशन दिलं होतं पण तिला रिजेक्ट करण्यात आलं. हे ऐकून करण शांत झाला, वास्तविक करणनं क्रितीला विचारलं की तिने ‘हीरोपंती’पूर्वी इतर कोणत्या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं का, ज्यामध्ये तिला नकार देण्यात आला. त्यानंतर उत्तर देत क्रितीनं ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी ऑडिशन दिल्याचे सांगितले. हे ऐकून करणला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही.

आणखी वाचा : कल्पना नसतानाच स्वत:चे Topless Photo पाहून काजल अग्रवाल हादरली; पुढे जे घडलं ते…

जेव्हा करणनं क्रितीला विचारलं की, टायगरनं कधी तिला रिलेशनशिपसाठी विचारलं नाही याचं वाईट वाटलं का? त्यावर क्रिती उत्तर देण्याआधीच टायगर बोलतो की क्रिती कमिटेड आहे. हे ऐकताच आश्चर्य चकित होतं क्रिती बोलते की ती कधीच टायगरला डेट करणार नाही. कारण तो फ्लिप करतो. 

आणखी वाचा : बीफ आवडतं…, ‘त्या’ व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’वर होणार परिणाम?

आणखी वाचा : ललित मोदींच्या अनुपस्थितीत सुष्मिता Ex Boyfriend रोहमन शॉलसोबत हे काय करतेय?

दुसरीकडे, जेव्हा करणनं टायगरला विचारलं की त्याला रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) कोणत्या गोष्टीचा हेवा वाटतो, तेव्हा टायगर बोलतो की दीपिका पदुकोण (Deepika Padukone). तेव्हा करण आश्चर्यानं बघतो, तर लगेच टायगर बोलतो की ती खूप प्रतिभावान आणि सुंदर आहे. ‘कॉफी विथ करण 7’ चा हा भाग गुरुवारी दुपारी १२ वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *