Headlines

वाई : अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून दरीत पडलेल्या जेष्ठ नागरिकाची १४ तासानंतर सुटका

[ad_1]

सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून तब्बल अडीचशे फूट दरीत पडलेल्या व गंभीर जखमी झालेल्या हनुमंत जाधव (वय ६४ राहणार दौंड) या जेष्ठ नागरिकाची १४ तासानंतर सुटका करण्यात शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीम आणि सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांच्या जवानांना यश आले.

अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेकजण फिरण्यासाठी जात असतात. हनुमंत जाधव हे सुद्धा शुक्रवारी सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी चालत असताना ते पाय घसरून दरीत पडले. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उठणे ही अवघड झाले होते.अंधार असल्यामुळे ते रात्रभर दरीतच पडून राहिले. आज सकाळी सहाच्या सुमारास काही जण किल्ल्यावर फिरण्यासाठी जात असताना त्यांना मदतीसाठी कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज दरीतून येत असल्याचे लक्षात आले.त्यावेळी त्यांना एक इसम दरीत पडल्याचे दिसून आले. याबाबत शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीम आणि सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांना कळविण्यात आले. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि मदत कार्य करणारे जवान दरीत उतरले. तब्बल १४ तासानंतर जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

जाधव हे साताऱ्यात दौंड येथून कोणाबरोबर आले होते हे अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरीतून वेळेत बाहेर काढले त्यामुळे त्यांचा जीव वाचवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *