Headlines

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

[ad_1]

WTC Points Table: इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याच्या नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबल मध्ये बराच मोठा फरक पहायला मिळतो. अशातच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर देखील WTC Points Table मध्ये ममोठा उलटफेर पहायला मिळतोय. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये अवघ्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने (Team India) सामना जिंकला आणि सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

17 फेब्रुवारी रोजी सुरु झालेला हा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यामध्ये देखील असंच झालं होतं. नागपूर टेस्ट टीम इंडियाने अवघ्या 3 दिवसांत संपवली होती. दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर झाला असून ऑस्ट्रेलियाची परिस्थिती फार खराब झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाचं पहिलं स्थान धोक्यात?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही जवळपास बॉर्डर-गावस्कर टॉफीच्या निर्णयावरून समोर येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र सलग 2 सामने हरल्यानंतर कांगारूंना फायनलचं तिकीट पटकावणं कठीण झालं आहे. 

याचं कारण म्हणजे दिल्ली टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या टक्केवारीत 3 पॉईंट्सटी वाढ झालीये तर, ऑस्ट्रेलियाने जवळपास तितकेच गुण गमावलेत. ज्यामुळे आता दोन्ही टीम्सच्या मध्ये केवळ 2 percentage points चं अंतर आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कमबॅक केलं नाही तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम 66.67 percentage पॉईंट्सवर पहिल्या स्थानावर आहे तर, टीम इंडिया percentage 64.06 पॉईंट्सवर दुसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच श्रीलंकेची टीम 53.33 परसेंटेज पॉईंट्ससोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशामध्ये टीम इंडिया फायनलमध्ये खेळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 

तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलिया वर टीम इंडियाचा दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर टीम इंडियाच्या वतीने शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

अश्विन-जडेजाची दमदार गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 264 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 262 वर आटोपला गेला. विराट कोहलीने  44 धावा केल्या तर  अक्षर पटेलने  74 धावा करत भारताला सावरलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 1 रनची लीड घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात रविंद्र जडेजा आणि आश्विने सटीक मारा करत 10 विकेट काढल्या. त्यात जडेजाच्या 7 तर आश्विनच्या 3 होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *