Headlines

महिलांसाठी WhatsApp ची सुपर ट्रिक, अशी ट्रॅक करा आपली menstrual cycle

[ad_1]

नवी दिल्लीःmenstrual cycle latest news : बाजारात सध्या अशा अनेक स्मार्टवॉच आणि मोबाइल उपलब्ध आहेत. जे महिलांना मासिक पाळी (menstrual cycle) ला ट्रॅक करत असतात. परंतु, हे करण्यासाठी तुमच्याकडे महागडी स्मार्टवॉच असायला हवी, असे काहीही नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने म्हणजेच व्हॉट्सअॅपच्या मदतीने हे ट्रॅक करू शकता. एक फेमनिन हाईजीन कंपनी Sirona ने महिलांच्या मासिक पाळीची माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर देशातील पहिला मासिक पाळी सायकल ट्रॅकर बनवला आहे. Sirona ने व्हॉट्सअॅप द्वारे ट्रॅकिंग सहज बनवण्यासाठी AI बेस्ड टेक्नोलॉजीची मदती घेतली गेली आहे.

याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे महिला पीरियड ट्रॅक करण्याशिवाय, गर्भधारणा पासून सुरक्षित राहण्यासाटी याची मदत घेऊ शकतात. याचा वापर करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. तुम्हाला फक्त एका नंबरवर व्हॉट्सअॅप वरून Hi लिहावे लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया फॉलो करावी लागेल. जाणून घ्या व्हॉट्सअॅप वर पीरियड्स कसे ट्रॅक करू शकतात.

वाचाः ‘या’ ८ स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही, कसं ते पाहा

व्हॉट्सअॅपवर मासिक पाळीला ट्रॅक कसे करू शकता
>> आपल्या फोनमध्ये 9718866644 नंबर सेव्ह करा. आता WhatsApp ओपन करा. त्या सेव्ह केलेल्या नंबरवर “Hi” पाठवा. तुम्हाला लगेच एक लिस्ट पाठवली जाईल.
>> पीरियड्सला ट्रॅक करण्यासाठी “period tracker” लिहून रिप्लाय करा.
>> पुन्हा तुम्हाला आपल्या पीरियड्सची डिटेल्स टाकावी लागेल.
>> या ठिकाणी तुम्हाला पुढील पीरियड, अखेरचा पीरियड यासह अन्य महत्वाची माहिती भरावी लागेल.
>> यूजर्सला त्यांचा पीरियड आणि मागील पीरियड संबंधी माहिती विचारली जाईल. चॅटबॉट याचा रेकॉर्ड ठेवेल.
>> यूजर्संना आगामी पीरियड्ससंबंधी अलर्ट देईल.

वाचाः Android स्मार्टफोनचे *#07#, *#0228#, *#0*# हे सीक्रेट कोड माहिती आहेत?

वाचाः WhatsApp Call Recording: WhatsApp वरही कॉल रेकॉर्ड करू शकता, जाणून घ्या सोपी ट्रिक्स

वाचा: Cheapest 5G Smartphones: भारतातील टॉप १० सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *