Headlines

एकच नंबर ! फोनच्या मदतीने माहित करा उंची, पाहा कसे वापरायचे हे फीचर ?

[ad_1]

नवी दिल्ली: LiDAR Feature: Apple iPhones जगभरातील स्मार्टफोन युजर्सचे आवडते मानले जातात. आयफोनची किंमत जास्त असल्याने यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असतात. अनेकदा तर यात देण्यात आलेल्या फीचर्सविषयी युजर्सना माहिती सुद्धा नसते . असेच एक फिचर म्हणजे म्हणजे LiDAR Scanner . कंपनीने फोनच्या रियर कॅमेर्‍यासोबत हे फीचर दिले आहे. याच्या मदतीने कोणाचीही उंची कॅमेऱ्यानेच मोजता येते. LiDAR किंवा लाइट डिटेक्शन आणि रेंजिंग युजर्सना पर्यावरण स्कॅन आणि मॅप करण्यास अनुमती देते.

वाचा: २१ हजारांचा ब्रँडेड Smart TV २४९९ रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी युझर्सची तुफान गर्दी, पाहा ऑफर

हे रडारसारखे काम करते. मात्र, यामध्ये अंतर आणि खोली केवळ लेझरद्वारे मोजली जाते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व iPhones मध्ये LiDAR स्कॅनर प्रदान केलेले नाही. हे फीचर फक्त iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 च्या प्रो मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे.

वाचा: रात्रंदिवस वापरा टीव्ही आणि पंखा, Electricity Bill चे नाही टेन्शन, हे डिव्हाइसेस करणार मदत, पाहा डिटेल्स

तुम्ही ते फक्त iPhone 12 Pro आणि Pro Max, iPhone 13 Pro आणि Pro Max आणि iPhone 14 Pro आणि Pro Max मॉडेलवर वापरू शकता. तसेच, तुम्ही ते आयफोनच्या मेजर अॅपसह वापरू शकता. यासाठी प्रथम तुमच्या iPhone वर Measure अॅप उघडा. यानंतर, ज्याची उंची तुम्हाला मोजायची आहे त्या व्यक्तीच्या दिशेने आयफोन पोझिशन करा. तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत कॅमेरा पॉईंट करावा लागेल. काही वेळाने व्यक्तीच्या वरच्या बाजूला एक लाईन दिसेल. हे हाईट मेजरमेंट लाईनच्या खाली दर्शवेल. मेजरमेंटचा फोटो घेण्यासाठी, तुम्हाला टेक पिक्चर बटणावर क्लिक करावे लागेल.

फोटो सेव्ह करण्यासाठी, खालच्या डाव्या कोपर्‍यातील स्क्रीनशॉटवर टॅप करा. यानंतर, Done वर क्लिक करा आणि Save to Photo किंवा Save to Files वर क्लिक करा. तुम्ही फोटो किंवा फाइल्समधून उंची मोजण्याचे फोटो सहजपणे शेअर करू शकता.

वाचा: या डीलसमोर सर्वच फेल ! Google चा ४३,९९९ रुपये किमतीचा स्मार्टफोन मिळतोय १५,००० पेक्षा कमीमध्ये

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *