Headlines

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

[ad_1]

मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेला प्रकार तर सर्वांनाच माहित आहे. जो सोशल मीडिवर चर्चेचा विषय ठरला होता. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल असा प्रकार त्या दिवशी घडला. खरंतर, ख्रिस रॉक डॉक्युमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. याचदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केली. त्यामुळे स्मिथला राग आला. त्यानंतर तो स्टेजवर आला आणि त्याने ख्रिस रॉकच्या जोरात कानाखाली मारली.

खरंतर, ख्रिस रॉकने  G.I Jane 2 चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. ज्यामुळे विल स्मिथला राग आला आणि त्याने हे कृत्य केलं. सुरुवातीला सर्वांना वाटलं की, हे स्क्रिप्टेड आहे. परंतु कालांतराने लोकांना या प्रकाराचं गांभीर्य लक्षात आलं.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्या प्रकारानंतर ख्रिस रॉकचं आयुष्य बदललं. घडलेल्या प्रकारामुळे तो इतका चर्चेत आला आहे की, आता त्याच्या शोची तिकीट देखील वाढली आहे. त्याचा शो पाहण्यासाठी लोक लांबवरुन प्रवास करु लागले आहेत.

खरंतर ऑस्कर सोहळ्यात जो प्रकार घडला, त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं होतं की, आता ख्रिसचं करिअर संपणार. परंतु हे  वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

ख्रिसच्या आगामी स्टँड-अप शोच्या तिकिटांची विक्री आणि किंमत दोन्ही वाढले आहेत. ऑनलाइन तिकीट मार्केटप्लेस Tickpick ने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सांगितले आहे की. त्यांनी गेल्या महिन्यापेक्षा काल रात्री जास्त तिकिटे विकली.

46 डॉलरचं तिकीट 411 डॉलरवर गेलं

Tickpick ने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ख्रिस रॉकच्या शोची तिकिटं आम्ही गेल्या संपूर्ण महिन्यात विकली, तितकी आम्ही फक्त कालच्या एका दिवसात विकली. 18 मार्च रोजी शोचे सर्वात स्वस्त तिकीट 46 डॉलर (रु. 3500) होते, जे आता 411 डॉलर (रु. 31,274) झाले आहे.

त्या एका कानशिलानं ख्रिसचं आयुष्य किती बदललं हे आपल्याला या वाढलेल्या तिकीटांच्या किंमतीवरुन दिसेल.

ख्रिस या शोसाठी 30 शहरांमध्ये जाणार

अमेरिकन मीडिया कंपनी व्हरायटीनुसार, ख्रिस 30 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत बोस्टनमधील विल्बर थिएटरमध्ये 6 शोमध्ये परफॉर्म करणार आहे. त्यानंतर 2 एप्रिलपासून तो ‘इगो डेथ वर्ल्ड टूर’ सुरू करणार आहे. अहवालानुसार, बोस्टन शोची तिकिटे लवकर विकली गेली. ख्रिस 30 शहरांमध्ये प्रवास करणार आहे ज्यासाठी 38 तारखा आधीच ठरल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *