पत्नीच्या आठवणीत बुमराह भावुक, फोटो शेअर करत म्हणाला, ‘प्लीज….’


मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. आयपीएलचे सामने मुंबई आणि पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबई संघाकडून खेळणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी बुमराहने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 

बुमराहने आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोवर इमोशनल कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. बुमराहला आपल्या पत्नीची खूप आठवण येत आहे. त्याने दोघांचा फोटो शेअर करत प्लीज लवकर ये, आपलं हसणं आणि जोक्स मी खूप मिस करतोय असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

यॉर्कर किंग बुमराह आपल्या पत्नीला खूप जास्त मिस करतोय हे यावरून दिसत आहे. सध्या संजना गणेशन न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंड इथे ICC महिला वर्ल्ड कप 2022 सुरू आहे. त्याचं अँकरिंग करण्यासाठी संजना न्यूझीलंडला गेली आहे.  

मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू आपल्या पार्टनरसोबत बायो बबलमध्ये आहेत. मात्र बुमराहला सध्या आपल्या पार्टनरसोबत बायोबबलमध्ये राहता येत नसल्याने त्याने आपल्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. 

जसप्रीत बुमराह आणि संजना यांनी 15 मार्च 2021 रोजी खास लोकांच्या उपस्थितीमध्ये शाही विवाह केला होता. बुमराह सध्या आपल्या पत्नीला खूप जास्त मिस करत असल्याचं या फोटोमधून दिसत आहे. 

मुंबई इंडियन्स यंदा सहव्यांदा ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यंदाची स्पर्धा जास्त कठीण असेल. 10 संघ आणि त्यामधून प्लेऑफ पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर असणार आहे. मुंबई संघ 15 व्या हंगामातील पहिला सामना 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. Source link

Leave a Reply