Headlines

विकेट जाण्यासाठी विराट जबाबदार? आऊट झाल्यानंतर Suryakumar Yadav ची रिएक्शन व्हायरल!

[ad_1]

गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 रन्सने पराभव करत तीन सामन्यांची सिरीज 2-0 अशी जिंकली. या सिरीजमधील शेवटचा T20 अजून खेळायचा आहे. या सामन्याचा सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा भारतासाठी हिरो ठरला. रनआऊट होण्यापूर्वी सूर्याने अवघ्या 22 चेंडूत 61 रन्स केले होते.

सूर्यकुमारच्या रनआऊटची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होताना दिसतेय. सूर्यकुमारही त्याच्या टी-20 कारकिर्दीतलं दुसरं शतक पूर्ण करेल असं वाटत होतं पण विराट कोहलीसोबत झालेल्या गैरसमजाने त्याची विकेट गेली. मात्र, या परिस्थितीत विराट कोहलीने त्याच्या विकेटचं बलिदान दिलं असतं तर भारतासाठी ते अधिक चांगलं होऊ शकलं असतं, असं अनेकांनी मत व्यक्त केलंय. 

भारताच्या डावाच्या 19व्या ओव्हरच्या सुरुवातीला विराटने कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला आणि सूर्यकुमार यादव एका रनसाठी धावला. बॉल थेट कव्हरवर उभ्या असलेल्या बावुमाच्या हातात गेला, विराटने तो पाहिला आणि रन काढण्यास घेण्यास नकार दिला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता कारण सूर्या कोहलीपर्यंत पोहोचला होता आणि थ्रोवर सूर्यकुमार रनआऊट झाला.

अशाप्रकारे रनआऊट झाल्यानंतर सूर्यकुमार विराट कोहलीकडे नाराजी व्यक्त न करता निघून गेला. यावेळी विराट कोहलीने त्याची माफीही मागितली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विराटने सूर्यासाठी आपली विकेट का बलिदान दिली नाही, असा प्रश्नही चाहते विचारतायत. 

सूर्यकुमारची तुफान खेळी

फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *