WI vs IND:वेस्ट इंडीज विरूद्ध सामन्यात शिखर धवनसोबत ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग

[ad_1]

मुंबई :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 22 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेसााठी कर्णधार रोहित शर्मासह अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर धवनसोबत ओपनिंगला कोणता खेळाडू उतरणार हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये  3 खेळाडूंची नावे चर्चेत आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूला संधी मिळते हे पाहणेचे महत्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियातून ओपनिंग करण्यासाठी तीन खेळाडूंची नाव चर्चेत आहेत. शुभमन गिल, ईशांत किशन, ऋतुराज गायकवाड या तीन खेळाडूंना ओपनिंगची संधी मिळणार आहे. 

या सीरिजमध्ये रोहितच्या जागी 22 वर्षीय शुभमन गिल ओपनिंगसाठी मैदानात उतरताना दिसू शकतो. या खेळाडूने 2020 मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला होता. शुभमन गिल या दौऱ्यात त्याचा ओपनिंग पार्टनर म्हणून खेळताना दिसू शकतो. तसेच गिलने कसोटी आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. शुभमन गिलने टीम इंडियासाठी अनेक मॅच विनिंग डाव खेळले आहेत. त्याने 11 कसोटी सामन्यात 579 धावा केल्या. यावेळी शुभमनने 4 अर्धशतक झळकवले आहेत. IPL 2022 मध्ये, शुभमन गिलने 16 सामन्यांमध्ये 34.50 च्या सरासरीने आणि 132.32 च्या स्ट्राईक रेटने 483 धावा केल्या आहेत. त्याचे नावही चर्चेत आहेत. 

ईशांत किशनचे नाव देखील ओपनिंगसाठी नाव चर्चेत आहे. त्याने IPL 2022 मध्ये 14 सामन्यात 418 धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने 3 सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 88 धावा केल्या आहेत. 

तिसरं चर्चेतलं नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड.  ऋतुराजने 14 सामन्यात 368 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वनडेत पदार्पण केले ना्ही. त्यामुळे तो या सामन्यात खेळून वनडेत पदार्पण करेल. याच सामन्यात त्याला ओपनिंगची संधी आहे.  

टीम इंडीयाचे हे तीनही खेळाडू ओपनिंगसाठी दावेदार आहेत. मात्र यामधून ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिखर धवनसोबत ऋतुराज गायकवाड ओपनिंगला मैदानात दिसणार आहे. 

टीम इंडियाचा टी20 संघ : 
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *