Headlines

WI vs IND:वनडे आणि T20I मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया आणि  वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका त्यानंतर पाच सामन्यांची T20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. याआधी जाणून घेऊयात वेस्ट इंडिजची दौऱ्याचे संपुर्ण वेळापत्रक आणि दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन. 

 इंग्लंड विरूद्ध टी-20 आणि वनडे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता उद्यापासून टीम इंडिया वेस्ट इंडीज विरूद्ध वनडे सामने खेळणार आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारख्या सिनीयर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर या सामन्यासाठी शिखर धवनला कर्णधारपद देण्यात आले आहे.  

दरम्यान T20I मालिकेसाठी रोहीतसह अनेक सिनीयर खेळाडू संघात परतणार आहेत. तर आऊट फॉर्म असलेल्या विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही मालिकांमधून विश्रांती देण्यात आली आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक 
पहिली वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, 22 जुलै ते संध्याकाळी 7 वाजता 
दुसरी वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, 24 जुलै ते संध्याकाळी 7 वाजता 
तिसरी एकदिवसीय: क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद – 7  वाजता

T20I मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20I: ब्रायन लारा स्टेडियम, टॉरोबा, त्रिनिदाद, 29 जुलै ते रात्री 8 वाजता 
दुसरा T20I: वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स, 1 ऑगस्ट ते रात्री 8 वाजता
तिसरा T20I: वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स, 2 ऑगस्ट ते रात्री 8 वाजता
चौथा T20I: सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा, 6 ऑगस्ट ते रात्री 8 वाजता
5वी T20I: सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा, 7 ऑगस्ट ते रात्री 8 वाजता

वनडेसाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: निकोलस पूरन (कर्णधार), शामर ब्रूक्स, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, कीसी कार्टी, काइल मेयर्स, जेसन होल्डर, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शाई होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.

भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवी बिष्णोई, भुवनेश्वर, कुलदेवता कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *