Headlines

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 Series मधून बाहेर? नेमकं कारण काय

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. त्यामुळे चाहते आणि निवड समिती खूप नाराज असल्याचं दिसत आहे. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला म्हणावं तसं यश मिळालं नाही. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिला सामना वगळला तर कोहलीची बॅट शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. आता कोहलीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. कोहली जूनमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिजमध्ये खेळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

विराट कोहली 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजसाठी टीम इंडियातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. हे सामने 9 ते 19 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी कोहलीला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

या सीरिजमध्ये फक्त विराट कोहलीच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह इतर काही वरिष्ठ खेळाडूंनाही आराम दिला जाण्याची शक्यता आहे. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या एका निवडकर्त्याने याबाबत माहिती दिली.

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियासाठी खेळणार नाही. त्याला आराम दिला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही सीरिजसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. 

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी सर्वात जास्त युवा खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर सीनियर खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. कोहलीची खेळण्याची इच्छा असेल तर त्यावर विचार केला जाईल असंही निवड समितीनं म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *