कोण आहे कृशा शाह? आज अंबानी कुटुंबाची होणार मोठी सुन


मुंबई : उद्योग क्षेत्रात अंबानी कुटुंबाचं मोठं नाव आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.आता या कुटुंबामध्ये आणखीनं एक सदस्य सामील होणार आहे. जी आता लवकरच या कुटुंबाची मोठी सूनबाई होण्यासाठी सज्ज आहे. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा

मोठा मुलगा जय अनमोल अंबानी 20 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी पत्नी कृशा शाह ही लवकरच अंबानी कुटुंबात पाऊल ठेवणार आहे.

कृशा शाह ही 2021 मध्ये खूपच चर्चेत होती. कारण याच वेळी अनमोल याने आपल्या 30 व्या वाढदिवशी कृशासोबत साखरपुडा केला होता. अनमोल याने युकेमध्ये शिक्षण घेत आज तो वडील अनिल अंबानी यांचा व्यवसाय सांभाळत आहे. तो वडीलांना कामात मदत करत आहे.

कृशाचा मुंबईत जन्म झाला असून ती एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तिने मुंबईत सुरुवातीचं शिक्षण घेतलं आहे आणि उच्च शिक्षण हे अमेरिका आणि युके येथे पुर्ण केलं आहे.

तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी अँड डेव्हलपमेंटमध्ये पदवी घेतली आहे आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे.याशिवाय ती ‘लव्ह नॉट फियर’ मोहिमेसाठी देखील काम करत आहे. या मोहिमेद्वारे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली जाते.

कृशा आणि तिचा भाऊ मिशाल शाह ‘डिस्को’ नावाची कंपनी चालवतात. कृशा ही  या कंपनीची सह-संस्थापक तसेच सीईओ आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय नसून अनेकदा ‘डिस्को’च्या इन्स्टा फीडवर व्हिडिओ शेअर करताना दिसते.

कृशा शाह हिचे वडिल बिझनेसमन आहेत आणि आई फॅशन डिझाईनर आहे.  तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘ तिला तिच्या वडिलांप्रमाणे उद्योग क्षेत्रात मोठं नाव कमवायचं

आहे.Source link

Leave a Reply