‘त्यानं म्हटलं म्हणून गेले आणि…’ प्राजक्ता माळीनं सांगितला ‘तो’ किस्सा…


मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्लॅनेट मराठीवर नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली.  सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का?  प्राजक्ताच्या सिने कारकिर्दीला कशी सुरुवात झाली. 

प्राजक्तानं अभिनयातून शिक्षण घेतलेलं नाही. ललित कला केंद्रातून डान्समधून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तिनं केलं आहे. त्यामुळे तिथे अभिनय आणि संगीत शिकवलं जातं. डान्स करत असताना डान्स ग्रुपमधील एक मुलगा एका सिनेमासाठी काम करत होता. तांदळा सिनेमाचं ऑडिशन सुरु होतं आणि त्यांना अभिनेत्री आसावरी जोशी यांचा तरुणपणीचा चेहरा हवा होता. 

प्राजक्ता पुढे म्हणाली, ‘एके दिवशी तो मुलगा मला रस्त्यात भेटला आणि मला पाहून थांबला.  त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला तू सेम आसावरी जोशींसारखी दिसते. त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, तू जा तिथे ऑडिशन देऊन ये. फक्त तोंड दाखवून ये. 

‘त्या दिवशी आम्ही दुसरीकडेच निघालो होतो आणि तो भेटला आणि आम्ही तिसरीकडेच गेलो. असंच तोंड दाखवायचं म्हणून मी गेले. तांदळा सिनेमासाठी मी गेले.  त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, पुढच्या आठवड्यात वेळ आहे तुझ्याकडे? मी त्यांना म्हणाले त्यादीवशी माझं कॉलेज आहे पण मी बंक करेन’, 

‘त्यानंतर त्यांनी लगेच मला फायनल केलं. माझी ऑडिशनही घेतली नाही. त्यांनी मला नावही विचारलं  नाही’.’मला त्या सिनेमात अभिनय करायचा नव्हता. फ्लॅशबॅक दाखवायचं होतं. तिचं लग्न दाखवायचं होतं’.तांदळाच्या सेटवर एका असिस्टंट डिरेक्टरला माझा आवाज आवडला. ज्यांनी मला गुड मॉर्निंग महाराष्ट्रच्या ऑडिशनसाठी नेलं.

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकताच प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड लाँच केलाय. त्यातील एका दागिन्याच्या कॅटेगिरीला तिनं सोनसळा असं नाव दिलंय. हे नाव तिच्या पहिल्या सिनेमातील व्यक्तिरेखचं होतं असं तिनं सांगितलंय. प्राजक्ताच्या या प्राजक्तराज या दागिन्यांच्या ब्रॅण्ड लाँन्चिग सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.Source link

Leave a Reply