Headlines

WhatsApp वर मिळवा PAN Card आणि DL चे डिटेल्स, फॉलो करा या स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली:WhatsApp DigiLocker Service :डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश लोकांना डिजिटल दस्तऐवज वॉलेट प्रदान करणे आहे. जेथे सामान्य युजर्स त्यांचे सर्व दस्तऐवज सेव्ह करू शकतात. महत्वाचे म्हणजे, डिजीलॉकरमध्ये सेव्ह असलेली सर्व कागदपत्रे मूळ कागदपत्रे मानली जातात. सरकारने घोषणा केली होती की, DigiLocker सेवा My Gov हेल्पडेस्कद्वारे WhatsApp वर युजर्ससाठी उपलब्ध असेल. डिजीलॉकरसारख्या सरकारी सेवांना सरकारकडून व्हॉट्सअॅपवर प्रवेश दिला जातो. म्हणजेच, तुमच्या फोनमध्ये WhatsApp असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डिजिलॉकर अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. अगदी सहज सोप्या पद्धतीने तुमचे काम होईल.

वाचा: One Plus चा ‘हा’ पॉप्युलर 5G फोन १८ हजारांपेक्षा कमीमध्ये होईल तुमचा, फोनचे फीचर्स लय भारी

ही काही कागदपत्रे डिजीलॉकरवर सेव्ह करता येतात :

पॅन कार्ड, चालक परवाना, CBSE वर्ग 10 पास मार्कशीट, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा पॉलिसी- दुचाकी, दहावीची मार्कशीट, वर्ग 12 ची मार्कशीट आणि विमा पॉलिसी दस्तऐवज.

वाचा: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास Amazon Great Indian Festival मध्ये मिळताहेत बेस्ट डील्स

WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क द्वारे असे डॉक्युमेंट्स ऍक्सेस करता येतात:

त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम +91 – 9013151515 सेव्ह करा आणि “डिजिलॉकर” टाइप करून या नंबरवर मेसेज पाठवा. ही संख्या देशभरात सारखीच असेल. तुम्हाला तुमचे डिजिलॉकर खाते तयार करून व्हेरिफाय करण्याचा आणि पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई मार्कशीट, आरसी सारखी कागदपत्रे डाउनलोड करण्याचा पर्याय दिला जाईल. डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइटवर पडताळणीसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. आधार क्रमांक टाकल्यानंतर, चॅटबॉट वन-टाइम पासवर्ड (OTP) च्या मदतीने त्याची पडताळणी करेल. सर्व कागदपत्रे व्हॉट्सअॅपवरून डाउनलोड केली जातील.

वाचा: Flipkart Big Diwali Sale मध्ये सॅमसंग, Redmi ते Apple पर्यंत स्वस्तात मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स, किंमत ८९९९ रुपयांपासून सुरू

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *